पालघर जिल्ह्यातील पालघर-सफाळे रोडवर माकुणसार हे छोटेखानी गाव आहे हे गाव मंदिराचे गाव म्हणून सुद्धा ओळखले जाते. गावात पद्मनाभ संप्रदायाचे श्री हरी मंदिर आहे, दत्तसंप्रदायाचे दत्त मंदिर आहे, गावच्या मध्यभागी चामुंडा देवी विराजमान आहे तसेच कुठेही सहसा न आढळणारे "ब्रह्मदेवाचे मंदिर" सुद्धा या गावात आहे.
पूर्वी माकुणसार हे दुधवाल्यांचे गाव म्हणून पन्नास-साठ वर्षांपूर्वी पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई महानगरीत सुद्धा प्रसिद्ध होते.. गावातील दूधवाले अहमदाबाद पॅसेंजर या गाडीने दररोज मुंबईत अप-डाऊन करत असत. त्यामुळे ही गाडी दूधवाल्यांची गाडी म्हणून प्रसिद्ध होती. दूधवाल्या लोकांसाठी रेल्वेने या गाडीला एक स्वतंत्र डबा दिला होता. दूध व्यवसायासोबत माकुणसार हे भाजीपाला, शेतीव्यवसायासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. “वाडीतली भाजी” म्हणून माकुणसार गावातल्या भाजीपाल्याला मुंबई मध्ये विशेष मागणी आहे.
सध्या गावातील तरुणांनी केटरिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे व त्यात नेत्रदीपक यश सुद्धा प्राप्त केले आहे. आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात माकुणसार हे गाव केटरिंग व्यवसायात अग्रेसर आहे. केसरी ट्रॅव्हल्स, राजाराणी ट्रॅव्हल्स या प्रसिद्ध ट्रॅव्हलिंग कंपनीमध्ये सुद्धा केटरिंग विभागाची धुरा माकुणसार कर यशस्वीपणे सांभाळत आहे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे गाव विशेष प्रगती करत आहे पालघर सफाळे रस्त्याला लागूनच “फिशरमन” नावाचे सर्व सुखसोयींनी युक्त असे रिसॉर्ट जिल्ह्यातील तसेच मुंबई-पुण्यातील पर्यटकांना खाद्य प्रेमींना भुरळ घालत आहे.
माकुणसार येथील खाडी परिसरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परदेशातून हजारो किलोमीटर प्रवास करून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
काय पहाल :
फ्लेमिंगो पॉइंट
श्री हरी मंदिर, श्री दत्त मंदिर, ब्रह्मदेवाचे मंदिर, चामुंडा देवी मंदिर, श्री राम मंदिर, एकविरा देवी मंदिर
माकुणसार येथील फिशरमन रिसॉर्टसह इतर रिसॉर्ट प्रसिध्द आहेत.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
संपूर्ण वर्षभर. फ्लेमिंगो पाहण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भेट द्यावी.
Current Temperature
25.3°С
Feels Like 26.1°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : सफाळे, पालघर
जवळचे बस / रिक्षा स्थानक : पालघर तसेच सफाळे स्थानकातून ठराविक अंतराने बसेस व सहा आसनी रिक्षा उपलब्ध
निवासाची सोय : माकुणसार, केळवे, पालघर येथे अनेक रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.