Pleasant Palghar
image

मेघराज मंदिर – जलसार मधील एक पुरातन वारसा

सफाळे रेल्वे स्टेशनपासून राष्ट्रीय महामार्गाच्या ८ किलोमीटर अंतरावर जलसार-किरईपाडा गाव वसलेले आहे. ह्या गावालगत डोंगरावर सुमारे ५०० वर्षे जुने मेघराज मंदिर असून हे मंदिर २ हजार ७५० फुट उंचावर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडी व चुन्याचा वापर करून बांधण्यात आले आहे. या मंदिरातील मेघराज देव व इंद्रदेव अशा दोन मुर्त्या लाकडावर कोरल्या आहेत. तर मंदिराच्या बाजूला दोन दगडाच्यामध्ये खोलवर एक बोगदा असून या बोगद्यामध्ये बारमाही पिण्याचे पाणी असते. या डोंगरावर जाण्यासाठी विराथन बुद्रुक, टेंभीखोडावे, जलसार, किरईपाडा या मार्गाने जाण्यासाठी डोंगराळ पायवाटा आहेत.

हे मंदिर जागृत देवस्थान असल्यामुळे दरवर्षी जून महिन्यात पाऊस जोरदार पडावा म्हणून होम पूजा हवन केले जाते. एका आख्यायिकेनुसार जलसार हे वरुण देवाच्या मामाचे गाव आहे व दरवर्षी वरून देव येथे भेट देतात. डोंगरावरील कुंड पाण्याने पूर्ण भरल्यानंतर डॉ ते तीन दिवसात मॉन्सूनला सुरुवात होते असा स्थानिकांचा विश्वास आहे. हे मंदिर आता ट्रेकिंग पॉइंट म्हणून प्रसिद्धी पावत आहे.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून

image

Current Temperature

 20°С

Feels Like 18.9°С. broken clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?