Pleasant Palghar
image

एडवण : वेदवन

एडवण  हे पालघर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे पण दुर्लक्षित असे बंदर.

अरबी सागराची गाज नित्यनेमाने या गावच्या कानावर पडते गावालगतच्या समुद्रात  खडकाळ भाग जास्त आहे या खडकांमध्ये  निरनिराळ्या आकाराचे व रंगाचे शोभिवंत दगड, शंख, शिंपले आपल्या नजरेस पडतात.

या किनाऱ्यालगतच्या  खडकांची दंगामस्ती करणाऱ्या उसळणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटांचं सुमधुर संगीत ऐकायच असेल तर मंदिरालगतच्या जेटीवर जाऊन तेथील प्रवाह खडकांवर जाऊन बसावे किंवा आशापुरी देवी च्या मंदिराच्या मागच्या बाजूस उंच खडकांवर बसून सभोवताली अथांग पसरलेला समुद्र  डोळ्यांमध्ये साठवावा.

खूप आधी स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट या गावात आले असताना या गावच्या या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडली आणि त्यांनी या गावचे नाव ठेवले “वेदवन”. एडवण  गावात अठरापगड समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात गावातील मराठी शाळेच्या मागे असलेल्या पडक्या किल्ल्याचे अवशेष तिथल्या पोर्तुगीजकालीन राजवटीची साक्ष देतात.  गावात रामाचे, बंदरावर महादेवाचे, आणि भर समुद्रात आशापुरी देवी चे जागृत मंदिर ही प्रमुख श्रद्धास्थाने आहेत.  महाशिवरात्रीनिमित्त गावात शंकराच्या मंदिराभोवती दोन दिवसीय जत्रा भरते त्यानिमित्ताने आजूबाजूच्या गावातील लोक  दर्शनासाठी व जत्रेचा आनंद लुटण्यासाठी येतात.

गावामध्ये मधील  आशापुरी मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. पंचक्रोशीतील आगरी व कोळी बांधव देवीची मनोभावे पूजा करतात. नवसाला पावणारी देवी म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. मंदिराच्या सभोवताली व मागच्या बाजूस नैसर्गिक रित्या तयार झालेला दगडांचा समूह छायाचित्रणासाठी व सध्याच्या “प्री वेडिंग शूट” करिता एक परफेक्ट लोकेशन आहे  या जागेवरून  समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा व त्याच्या साक्षीला सूर्यास्त पाहण्याची जी मजा आहे ती शब्दात सांगता येत नाही त्यासाठी  स्वतः इकडे   यायलाच हव.या मंदिरात जाण्यासाठी आता कॉंक्रिटचा पक्का रस्ता तयार केला गेला आहे त्यामुळे कोणत्याही ऋतूत अगदी  भरतीच्या वेळेस सुद्धा या मंदिरात आपण जाऊ शकतो.


काय पहाल :

स्वयंभू शंकराचे मंदिर,एडवण जेटी, आशापुरी मंदिर 

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

ऑक्टोबर ते मे

image

Current Temperature

 30°С

Feels Like 35.7°С. clear sky

गॅलरी

कसे पोहोचाल?