Pleasant Palghar
image

किल्ले वसई : रणझुंजार मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा साक्षिदार

महाराष्ट्र हा दुर्ग व लेणी यांचा देश आहे. या देशी आहेत तितके विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग कोठेही नाहीत. सिंधूसागर आणि सह्याद्री ही या देशीची दोन आभुषणे. प्राचीन काळापासून सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव यांच्यासारख्या समृद्ध आणि संपन्न राजघराण्यानी या प्रदेशात राज्य केले. अनेक दुर्गम दुर्ग त्यांनी उभारले. काही सागरी तर काही डोंगरी, काही भुईकोट तर काही घाटमाथ्यावर. या किल्ल्यांनी येथील राज्याच्या, प्रजेच्या आणि व्यापाराच्या समृद्धी मध्ये फार मोठे योगदान दिले आहे. वसई ते डहाणू ह्या भागात १३व्या शतकात नाथाराव सिंदा भोंगळे याचे राज्य होते. वसई किल्ल्याच्या जागी सर्वात आधी यानेच चार बुरुजांचा किल्ला बांधला. पुढे गुजरातच्या सुलतानाशी झालेल्या लढाईमध्ये हार पत्करुन त्याने वसई - तारापुर ते डहाणू हा भाग सुलतानाला सोपवला. बराच काळ मुस्लिम अधिपत्याखाली राहून सुद्धा ह्याभागात बहु संख्या प्रजा हिंदूच होती. बिंबराजा सोबत येउन येथेच स्थायिक झालेले सोमवंशी क्षत्रिय हे येथले मुख्य रहिवाशी. 

पुढे १६व्या शतकात धर्म प्रसाराच्या उद्देशाने आलेल्या पोर्तुगिझांनी ह्या भागावर ताबा मिळवला. वसई ते डहाणू भागात त्यांनी अनेक किल्ले उभे केले. समकाळात दख्खनेवर मुस्लिम सत्तांची आक्रमणे सुरूच होती. १३व्या शतकात खिलजीने यादवांचे देवगिरीयेथील राज्य बुडवले. तर १४व्या शतकात विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. नंतरच्या बहमनी, मुघल आणि इतर पातशहांनी महाराष्ट्रातील प्रजेवर अनेक जुलुम अत्याचार केले. युरोपातून आलेल्या इंग्रज, पोर्तुगिझ, फ्रेंच आणि अफ्रिकेमधल्या हबशी सिद्दी यांनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आपले हातपाय पसरले होते. यात सर्वात पुढे होते ते पोर्तुगिझ. त्यांनी बांधलेल्या सागरी किल्ल्यांचे अवशेष आज सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये पाहता येतात. वसई ते डहाणू आणि पुढे ठाणे-घोड़बंदर ते बेलापुर अशी ३०हून अधिक जलदुर्गांची मालिका त्यांनी तयार केली होती. त्यात वसईचा किल्ला सर्वश्रेष्ठ. ऐन खाडीच्या मुखावर बांधलेला, ११० एकर पसरलेला आणि १० भक्कम बुरुज असणारा असा हा किल्ला. तर केळवे-माहिम भागातल्या १७ किल्ल्यांच्या बांधकामाची साखळी ही आगळी-वेगळी गोष्ट पहायला मिळते. आज मध्यवर्ती जेल म्हणुन वापरात असलेला ठाण्याच्या किल्ला पोर्तुगिझांनी मराठ्यांच्या हालचाली पाहून १७३०-१७३४ मध्ये ४ वर्षात २२ एकर जागेवर बांधून पूर्ण केला. वसई किल्ल्या खालोखाल ठाणे आणि अर्नाळा किल्ल्यान्ना महत्त्व होते. या शिवाय ठाणे, वसई, भाईंदर, वैतरणा या खाड़यावर त्यांचेच वर्चस्व होते. आसपास असणाऱ्या अशेरीगड़, कोहोज, तांदूळवाडी, टकमकगड़, काळदुर्ग, गंभीरगड़ या किल्ल्यांवर सुद्धा त्यांनी ठाणी बसवली होती.त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्वाचा होता. पोर्तुगिजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमांजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३७ ते १७३९ मध्ये मोठी मोहीम आखली आणि वसईचा किल्ला प्रत्यक्षात रविवार दिनांक १३ मे सन १७३९ म्हणजेच वैशाख वद्य व्दितीया या दिवशी मराठ्यांच्या ताब्यात आला.या मोहिमेत २० किल्ले, ३४० गावांचा प्रदेश,  सुमारे २५ लाखांचा दारूगोळ्याची मराठी दौलतीत भर पडली. पोर्तुगीजांची धर्मांध जुलमी सत्ता उत्तर कोकणातून नष्ट होऊन हिंदवी स्वराज्याचा अंमल सुरू झाल्याने प्रजा अत्यंत आनंदली.

इतिहास :

इ.सन १४१४ मध्ये भडारी भेंगाळे नावाच्या सरदाराने हा किल्ला बांधला. इ.स. १५३० मध्ये गुजराताच्या सुलतानाने हा किल्ला त्याच्याकडून जिंकून घेतला. पुढे १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपर्य़ावर एक बुरुज आहे. त्याची लांबी रुंदी एक किमी आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. एका बाजूस अथांग सागर व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत. सोपर व गोखरावा येथे पूल आहेत, असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे.


मुंबई जवळील साष्टी म्हणजे ’सहासष्टी’ नावाचा प्रदेश होता. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ गेला. त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली.इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी मोहिम आखली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ’हर हर महादेवाच्या’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले, त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे मारली गेली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले.मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायका मुलांना सुखरुप जाऊ दिले.

पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यास सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भुमार्ग या दोन्ही बाजूंनी किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. कर्नल हार्टले कल्याणवरुन हल्ला करणार होता, तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रुला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या ८ किमी गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज व तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होते. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरु झाली. मराठ्यांनी सुध्दा बुरुजावरुन गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळे जण घाबरुन गेले. ९- १० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला १२ डिसेंबरला किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला.

पहाण्याची ठिकाणे :

गावापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात उजवीकडे प्रवेशद्वार आहे त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायर्य़ा आहेत त्यावरुन सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे किल्ल्याला दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज.


येथून पुढे आपण बालेकिल्ल्याकडे जातो. बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात. बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे वळावे, समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलिकडे एक हॉस्पिटल आहे. तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्या पुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे. पुढे चिमाजी आप्पांची विजय मिळवल्याबद्दलचे प्रतीक उभारलेले आहे. हे सर्व पाहून मागे फिरायचे आणि बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा. बालेकिल्ल्यात दारु कोठार, सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. एका दगडावर कोरलेला शिलालेख सुध्दा आहे बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहिर आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे. दोन तासात सर्व गड पाहून होतो.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

सर्व ऋतुमध्ये

image

Current Temperature

 30°С

Feels Like 30.7°С. clear sky

गॅलरी

360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा

कसे पोहोचाल?