जव्हार हे पालघर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू, (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.
काय पाहाल
भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
24.4°С
Feels Like 25.2°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे बस स्थानक : जव्हार आगारातून झाप गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने झाप गावात उतरावे तिथून गडावर जाण्याचा सोपा मार्ग आहे.