Pleasant Palghar
image

विरारची आदिशक्ती जीवदानी माता

अनेक शक्तिपीठांपैकी एक असलेली वसई तालुक्यातील विरारची जीवदानी देवी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. केवळ वसई तालुक्यातच नव्हे, तर राज्यभरात या देवीची ख्यातकीर्त असून शेकडो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दररोज येत असतात.

विरार रेल्वे स्थानकातून पूर्वेला पाहताच आपले लक्ष वेधून घेते ते जीवदानी देवीचे डोंगर. विरार पूर्वेला जीवदानी माता डोंगरावर स्थिरावली आहे. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. मात्र कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. मात्र त्याच्या प्राचीन खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६ मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले.

९०० फूट उंचावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंट-काँक्रीटच्या पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे. तब्बल १४०० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. त्याचसोबत  रोप-वे ची सोयही आहे.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 29.1°С

Feels Like 32°С. clear sky

गॅलरी

कसे पोहोचाल?