Pleasant Palghar
image

अंबोडे

पालघर तालुक्यातील ऐतिहासिक भवानगड किल्याच्या पायथ्याशी १००% बौध्द वस्ती असलेले अंबोडे गाव वसलेले आहे. सुप्रसिद्ध केळवे बीचपासून १.५ किलोमीटरवर वसलेल्या, जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या ह्या छोट्याश्या गावात नालंदा बुध्द विहार जिल्ह्यातील बौध्द समाजाचे आवडीचे ठिकाण. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली नागपूर येथे धर्मांतर केले. त्यानंतर बाबासाहेबांचे सुपुत्र श्री.भैयासाहेब आंबेडकर ह्यांनी अंबोडे गावास भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान अंबोडे येथील नागरिकांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. तत्पूर्वी २९ मार्च, १९३६ रोजी मा.बाबासाहेब आंबेडकरांनी शेजारील वेधी गावास भेट दिली होती. त्यावेळेस झालेल्या भव्य सभेनंतर येथे सामाजिक चळवळीला सुरुवात झाली.

११ एप्रिल १९९१ साली गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावाशेजारील डोंगरावर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर स्मारक बांधले आहे. त्यानंतर १८ मे, २०१५ रोजी येथे नालंदा बुध्द विहाराची उभारणी झाली. जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून येथे स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले. टेकडीवर वसलेल्या अतिशय सुंदर अश्या ह्या स्मारकाच्या परिसरातून भवानगड किल्ला, अथांग समुद्र असे नयनरम्य दृश्य दिसते. फक्त बौध्द समाजानेच नाही तर सर्वांनीच भेट देण्यासारखे हे प्रेरणादायी स्मारक आहे.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 25.8°С

Feels Like 26.6°С. overcast clouds

गॅलरी

360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा

कसे पोहोचाल?