Pleasant Palghar
image

बोर्डी

महाराष्ट्र राज्याच्या गुजरातलगत किनारपट्टीवरील बोर्डी समुद्र किनारा  हा नितांत रमणीय सागरी किनारा आपल्याला एका अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतो. डहाणू आणि  घोलवड सोबतच चिकूसाठी प्रसिध्द असलेल्या बोर्डीने वारली आदिवासीं बरोबरच पारशी समाजही आपल्यात सामावून घेतला आहे. 


मुंबईहून निघाल्यावर नँशनल हायवे ४८ किंवा वेस्टर्न रेल्वेने साधारण ३ तासांतच आपण बोर्डीला पोहचतो. विविध रंगीबेरंगी वस्तूंनी आणि ताज्या टवटवीत कमळांनी सजलेली छोटी छोटी दुकाने आपले स्वागत करतात. कमळे प्रिय असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरामुळे ही भूमी पावन झाली आहे.


हिरव्यागार डोंगराच्या सावलीत विसावलेल्या फळांच्या बागा बघून डोळ्यांचे पारणे फिटते. समुद्र किनाऱ्या लगत असलेला प्रवासी रस्ता मन खूप प्रसन्न करतो. वारली, आदिवासी, वाडवळ, कोळी या समाजासोबत पारशी समाज सुद्धा अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्य करून आहे. शेती, वाडी, मासेमारी व पर्यटन हे येथील स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधने.


पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याने हे गाव हरितक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे इथे शहरीकरणाची छाप नाही. माणसांचे अतिक्रमण नसल्याने बोर्डीचा हा नैसर्गिक किनारा आजही आपल्याला भुरळ पाडतो. किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटांची लहर आपल्याला मंत्रमुग्ध करते. सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी मासेमारी करून परतणाऱ्या होड्या पाहणे आणि बाजारात त्याच ताज्या मासळीची खरेदी करणे ही इथली मेजवानीच. त्यातही येथील कृषी पर्यटन केद्रात राहण्याचा अनुभव घेता येणं म्हणजे दुग्धशर्करा योगच!


काय पाहाल :


अस्वली डॅम, फाँरेस्टगार्डन, नरपड समुद्रकिनारा, कोसबाड  येथील ग्राममंगल या अनुताईवाघ व ताराबाईमोडक यांच्या शैक्षणिक संस्था, कोसबाड येथ जैने मंदिर, बल्लाळगड, गंभीरगड, सावतेकोट, सेगवागडकिल्ला या ऐतिहासिक वास्तू बोर्डीच्या 2५ कि.मी. परिसरामध्ये पाहायला मिळतात. 


बोर्डी येथील चिकू फेस्टिवल हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.


या भागात पर्यटकांना राहण्यासाठी लहान-मोठी कृषीपर्यटन केंद्र, रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. या कृषी पर्यटन केंद्रांवर राहण्याचा अविस्मरणीय अनुभव पर्यटकांना येथे पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहित करतो.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 25.6°С

Feels Like 26.4°С. broken clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?