जव्हारपासून ४५ किमी वर निसर्गाच्या कुशीत वसलेला देवबांधचा गणेशाचा निसर्गरम्य परिसर सध्या पर्यटकांना खुणावत आहे. मोखाडा तालुक्यातील देवबांध हे अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले स्थान आहे. देवबांधला सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाने श्रीसुंदरनारायण गणेश संस्कार केंद्राची स्थापना केली गेली आहे. १९८६ ला देवबांधचे श्रीगणेश मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिरात असलेली मूर्ती वसंतराव दीक्षित यांनी संस्थेस भेट दिलेली आहे. गणेशाची मूर्ती पंचधातूची बैठी असून ध्यान संपूर्ण गजमुख आहे. अंगावर कोरीव अलंकार आहेत. लंब उदराभोवती सर्पमेघला आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. मागील हातात खङग व परशु तर पुढील उजवा हात आशीर्वाद देणारा तर डाव्या हातात मोदक आहे. डाव्या मांडीजवळ मूषक आहे.
हे मंदिर नाशिकच्या श्रीसुंदर नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. या देवालयाच्या मंडपावर एक मुख्य घुमट व त्या भोवती तीन छोटे घुमट आहेत. मुख्य गाभाऱ्यावर एक मनोराकृती घुमट आहे. या स्थानाला देवबांध गणपती म्हणतात, त्याला कारण इथून नागमोडी वळणे घेत वाहत जाणारी देवबांध नदी!देवबांधचे नाव नकाशात दिसत नाही. त्याचे कारण असे की नदीच्या ठराविक अंतराच्या भागालाच हे नाव आहे. मुख्य नदी वैतरणा. वैतरणेची ही उपनदी, या नदीचं नाव पिंजाळ. पालघर जिल्ह्याच्या मोखाडा गावात ही नदी उगम पावते. तिच्यावर खोडाळा गावाजवळ पूल आहे. कसाऱ्याहून जव्हारला जाणारी बस या पुलावरून जाते. पुलावरून उजवीकडे नजर फिरवली की नदीच्या पात्रात एक प्रचंड शिळा नदीचं अर्ध पात्र अडवून बसलेली दिसते. कोठूनशी कोसळलेली नसून हेतूपूर्वक आडवी ठेवल्यासारखी वाटते. देवांनी हा बांध घातला म्हणून याला 'देवबांध' असे आदिवासी म्हणतात. तर पाच पांडवांपैकी भीमाने केलेला हा उद्योग आहे असंही म्हणतात.
या देवस्थानामुळे परिसरातील आदिवासींमध्ये आता सुधारणा घडून येत आहेत. श्रद्धावान वनवासींचा भक्तिभाव या स्थानामुळे वाढत आहे. विशेष म्हणजे नागमोडी वळणे असलेले रस्ते, खोल दरी तरीही या परिसरात कुठलाही मोठा अपघात होऊन जिवीतहानी झाली, असे घडले नसून असा चमत्कारिक अनुभव आहे असे श्रद्धाळू भाविक म्हणतात. मंदिरात येणारे भाविकही देवबांधचे हे स्थान अतीशय जागृत असल्याचे सांगतात.
गणेशासमोर तुळशीच्या माळा ठेवलेल्या असतात. आदिवासी ताडी-माडीच्या नशेत धुंद असतात, त्यातच ते भुकेसाठी जे जनावर मिळते ते मारून खातात. त्यांना गणपती उत्सवाच्या दिवशी शुचिर्भूतवस्थेत मंदिरात आणले जाते व व्यसनींना व्यसनमूक्तीची शपथ घ्यायला लावून त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. श्रद्धाळू आदिवासींवर याचा अनुकूल परिणाम होऊन हजारोजण व्यसनमूक्त झालेत.पालघर जिल्ह्यातील मोखाडा हा आदिवासी तालुका असून जव्हार ते शहापूर बसमार्गावरील मोखाडा, खोडाळा, वाशाळा, पाशाळा अशी बसस्थानके घेत घेत जाणारा हा रस्ता सह्याद्रीच्या कुशीतून घनदाट झाडीमधील रस्त्यावरून लहान लहान वळणे घेत प्रवासाचा सुखद आनंद देतो. आदिवासींच्या वाड्या-पाड्याजवळून सरकणारा हा रस्ता डोंगराळ भागातून जातो. दमण या केंद्रशासीत भागातील सेल्वास व वापी या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात. त्यांना जव्हारमार्गे जावे लागते.देवबांध गणेश हे स्थान जव्हारपासून तासाभराच्या अंतरावर आहे. देवबांध व आजूबाजूच्या परिसरातील १६० गावांचे लोक इथे मोफत वैद्यकीय उपचारासाठी येतात. औषधेही विनामूल्य दिली जातात. ८० सालापासून हे कार्य अखंडपणे चालू आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णास ठाणे, नाशिक इत्यादी भागांतील मोठ्या रुग्णालयात पाठवून विनामूल्य वैद्यकीय सेवाही पुरवीली जाते.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
संपूर्ण वर्षभर.
Current Temperature
24°С
Feels Like 24.8°С. overcast clouds360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा
कसे पोहोचाल?
देवबांधपासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कसारा हे आहे. इथून कसारा ते खोडाळा-मोखाडा मार्गावर सतत प्रवासी जीपवाहतूक चालू असते. एस.टी. वाहतूक मात्र तुरळक आहे.दुसऱ्या बाजूने इगतपुरी रेल्वे स्टेशनपासूनही या गणपती स्थानकावर येणे सोयीस्कर आहे. नाशिकहून इगतपुरीमार्गे देवबांध-जव्हार अशी बससेवा उपलब्ध आहे.