Pleasant Palghar
image

किल्ले तांदुळवाडी : वनदुर्ग तांदुळवाडी

तांदुळवाडी किल्ला पश्चिम रेल्वेवरील सफाळे स्टेशनच्या ईशान्य दिशेला सुमारे साडेचार किमी अंतरावर आहे. वृक्षवेलींनी मंडीत असा हा सुंदर गड  एका दिवसात पाहाण्याजोगा आहे. 


इतिहास :

या गडाचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात ठाणे गॅझेटिअर्स मध्ये पाहावयास मिळतो. तो खालीलप्रमाणे ;

तांदुळवाडी किल्ला माहीमच्या (केळवे माहीम) आग्नेय दिशेस सुमारे १६ किमी अंतरावर असून हे स्थान ५७९ मीटर्स (सुमारे १९०० फूट) उंचीच्या डोंगरावर आहे. सफाळे रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस ४.८० किमी अंतरावर हा किल्ला आहे. मराठ्यांनी इ.स. १७३७ साली हा किल्ला हस्तगत केला होता. या डोंगरमाथ्यावर पाषाणात खोदलेली अनेक पाण्याची टाकी, जलकुंभ असून तटबंदीच्या खुणाही आढळतात. डोंगराच्या पूर्व पायथ्याजवळून वैतरणा नदी वाहते. नदीशेजारीच ललठाणे नावाचे खेडे वसलेले आहे. गावाजवळच जलसंचयिका असून ती पोर्तुगीजांनी बांधली असावी.तेराव्या शतकात राजा भीमदेव याचे राज्य समुद्राकाठी शूर्पारक (नालासोपारा), महिकावती(माहीम) येथे होते. पुढे इ.स. १४५४ साली अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती सर केले. त्यांच्यापैकी एका बहादूरशहाने मलिक अल्लाउद्दीन नावाच्या सरदाराला तांदुळवाडीचा किल्लेदार केले. त्यानंतर या भागावर पोर्तुगीजांनी अंमल बसविला. पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या हातात आला.


किल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक तांदुळवाडी तर दुसरा लालठाणे! किल्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता असल्यामुळे ग्रामीण संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या वेळी ह्या किल्याची चढाई केव्हाही उत्तम!

गडावर चढत असताना सुरुवातीला पायवाट असून नंतर डोंगराचा रस्ता आहे.. पायऱ्यामधील अंतर अधिक असल्यामुळे गड चढताना थकवा जाणवू शकतो. किल्यावर जाण्यासाठी जागोजागी दिशानिर्देषक फलक असल्यामुळे मार्ग चुकण्याची भीती नाही. गडाच्या मार्गिकेवर या भागामध्ये अधिवास असणाऱ्या प्राणी-पक्षांची माहिती दिली आहे. त्यामध्ये राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, ससे ई. माहिती उपलब्ध करून दिली आहे.


पहाण्याची ठिकाणे :

पायथ्यापासून गडावर चढून गेल्यावर दगडांनी रचलेली तुटक अशी चार फूट उंचीची तटबंदी आहे. या तटबंदीच्या दिशेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी चौकोनी हौद दिसतो. भिंत उजवीकडे ठेवत, तिच्या बाजूने थोडे खाली उतरल्यावर पश्चिम टोकाकडून येणारी वाट दिसते. या वाटेवरून पुढे गडाच्या पूर्व व पश्चिम कड्यापाशी खडकात खोदलेली पाण्याची सुमारे पंचवीस कुंडे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवितात. गडावरुन आजूबाजूचा परिसर दिसतो. या गडावरील रानात विविध जातींची वृक्षवेली, वनौषधी व अनेक जातींचे पशुपक्षी आढळतात.


तांदुळवाडीचा धबधबा मॉन्सून ट्रेकसाठी प्रसिध्द आहे.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

सर्व ऋतुमध्ये. परंतु मॉन्सूनमध्ये तांदुळवाडी धबधबा, हिरवाई ई. मुळे येथे पर्यटकांची गर्दी होते.

image

Current Temperature

 24.7°С

Feels Like 25.4°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?