पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सर्वात सुंदर आणि सर्वात जास्त पर्यटकांनी गजबजलेले गाव म्हणजे केळवे. बहुतेकवेळा केळवे-माहीम असा जोडाक्षरांनी यांचा उल्लेख होत असला तरी केळवे आणि माहीम ही दोन स्वतंत्र गावे आहेत. स्वच्छ सुंदर आणि रमणीय समुद्रकिनारा लाभलेल्या या गावचा चेहराच लोभसवाणा आहे. केळवे समुद्र किनाऱ्याजवळील घनदाट झाडी, त्यात हरवलेला केळवे कोट, किनाऱ्यावर असलेली भेळ पुरी, पाणीपुरी, नारळपाणी विक्रेत्यांचे स्टॉल, पर्यटकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात..शांत व स्वच्छ समुद्रकिनारा लाभल्यामुळे शनिवार-रविवार, आठवडी सुट्टी, दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष व शाळेच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होते. पर्यटकांच्या राहण्याच्या व जेवणाच्या सोयीसाठी अनेक लहान-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स माफक दरात उपलब्ध आहेत. केळींसाठी हे गाव प्रसिद्ध आहे त्यामुळे या गावचं नाव केळवे पडलं असं म्हणतात. वि.का.राजवाडे यांनी केळवे गावची व्यतुप्ती कदलीवहं अशी सांगितली आहे जी योग्यच आहे. शहाळी आणि नागवेली ह्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येथे होते. येथील नागवेलीची पाने सुरत, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे जातात. पूर्वी पाकिस्तानात सुद्धा येथून नागवेलीची पाने निर्यात होत असत. एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत गाव म्हणून केळवे ओळखले जाते.
आज दिसणारे शितलादेवीचे मंदिर एकेकाळी खूप छोटे आणि साधे होते. हे मंदिर रामायणाइतके प्राचीन असावे असे म्हणतात. या मंदिरात शितलादेवी, गणपती, महादेव आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या समोर एक तलाव आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या भागातून जात असताना त्यांना तहान लागली तेव्हा त्यांची तहान शमविण्यासाठी त्यांनी बाण मारून या कुंडाची निर्मिती केली म्हणून त्यास रामकुंड असे म्हणतात. या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या शतकात केला. आजच्या या मंदिराचं वैभव पाहिलं की गोव्यातील शांतादुर्गा, मंगेशी इत्यादी मंदिरांची आठवण येते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला शितलादेवी मंदिरासमोर मोठी जत्रा भरते ही जत्रा तीन दिवस चालते. गावात कालिका तथा काळबादेवीचे मंदिर आहे या मंदिराचे शिल्प अतिशय देखणे असून एक जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त केळवे बाजारात हनुमंताचं आणि प्रभू रामाचं मंदिर आहे. शिवाय गावात एक मशीद सुद्धा आहे. केळवे कधीकाळी एक महत्त्वाचं लष्करी ठाणं होतं. या गावाने कधीकाळी अनेक लढाया पाहिल्या आहेत. दांडा खाडीच्या मुखाशी असलेला एक छोटा जलदुर्ग पाण बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे. किनाऱ्याजवळील झाडीत विसावलेला भुईकोट किल्ला आणि खाडी पाशी असलेला जलदुर्ग हे इतिहासाचे साक्षीदार आहे.. भुईकोट किल्ला असल्यामुळे हा किल्ला चढायला तसेच बघायला सोपा आहे या किल्ल्याची संरक्षण भिंत साडेपाच फूट उंचीची आहे. तसेच तिचा आकार पंचकोनी आहे. तोफा डागण्यासाठी छिद्रं सुद्धा आहेत.. दांडा खाडीच्या मुखाशी असलेला केळवे जलदुर्ग हा जंजिरा प्रकारात मोडतो त्यामुळे भरती आणि ओहोटीच्या वेळा बघून येथे जाणे उत्तम.
काय पहाल :
शितलादेवी मंदिर, काळबादेवी मंदिर, हनुमान मंदिर
केळवे बीच, भुईकोट किल्ला
केळवे-पाणकोट
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
संपूर्ण वर्षभर
Current Temperature
25.2°С
Feels Like 25.9°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : केळवे रोड, पालघर
जवळचे बस / रिक्षा स्थानक : पालघर बस स्थानकातून ठराविक अंतराने बस बस व रिक्षा उपलब्ध
निवासाची व्यवस्था: केळवे येथे अनेक रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.