Pleasant Palghar
image

खोडाळा

खोडाळा.. सह्याद्रीच्या दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर असलेले खोडाळा हे पालघर जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले खोडाळा तेथील निसर्ग, आदिवासी संस्कृती, हवामान, नैसर्गिक धबधबे, ट्रेकिंग, घनदाट जंगल, पक्षी निरीक्षण अश्या अनेक आकर्षणांनी समृद्ध आहे. येथे तुम्हाला मोबाईलची कनेक्टीविटी कमी भेटत असली तरी निसर्गाशी कनेक्टीविटी अगदी २४ तास नक्कीच मिळेल.

खोडाळ्याच्या आसपास असलेली आदिवासी गावे स्वतःची पारंपारिक मुल्ये, संस्कृती जपून आहेत. येथील गावात विशेष प्रसंगी  रात्रभर आदिवासी नृत्य आणि संगीत साजरे केले जाते हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. आदिवासी सणांच्या काळात येथे आवर्जून भेट द्या.

खोडाळ्याजवळ असलेले देवबांध, विहीगाव धबधबा, सुर्यमाळ ह्या प्रसिध्द स्थळांसोबतच खेरवाडी येथे असलेले वाइल्ड कॅम्प येथील ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग, नाईट सफारी, वॉटरफॉल रॅपलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी  प्रसिध्द आहे.

खोडाळ्यात पक्षी निरीक्षण देखील प्रसिध्द आहे. खोडाळ्याच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात अनेक पक्षी आणि स्थलांतरित पक्षी येतात.

चला तर, कशी येतायेत खोडाळ्याला.. निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी..

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून

image

Current Temperature

 23.9°С

Feels Like 24.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?