Pleasant Palghar
image

पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर - जव्हार

जव्हार हे मुंबईच्या इतक्या जवळ असूनसुद्धा तुलनेने अपरिचित असे हिल स्टेशन रिट्रीट आहे. विपुल निसर्गसौंदर्य, घनदाट जंगल, नयनरम्य वातावरण आणि वर्षभर आल्हाददायक हवामान यामुळे जव्हार हे विकेंडला नवसंजीवनी देणारे एक उत्तम ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ५१८ मीटर उंचीवर वसलेल्या जव्हारमध्ये कमाल तापमान 20°C ते 25°C पर्यंत राहते.

जव्हार मुंबईपासून सुमारे 120 किमी, नाशिकपासून 80 किमी आणि वापी, गुजरातपासून 80 किमी अंतरावर आहे. पालघर जिल्ह्यात वसलेले, जव्हार हे आदिवासी सांस्कृतिक वारसा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. जव्हार हे नैसर्गिक सौंदर्य आणि मानवनिर्मित चमत्कारांनी समृद्ध आहे.

ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्य मंदिरे, निर्मळ वातावरण असलेले निवांत तलाव, नैसर्गिकरीत्या निसर्गरम्य ठिकाणी असलेले धरणे आणि डाउन व्हॅलीचे सुंदर विहंगम दृश्य देणारी विलोभनीय पर्यटन स्थळे ही काही आकर्षणे आहेत जी देशी-विदेशी पर्यटकांना जव्हारकडे आकर्षित करतात. सभोवताली विपुल नयनरम्य घनदाट हिरवीगार झाडे आणि त्याच्या विलोभनीय सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि वर्षभर आनंददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जव्हारला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे .

जव्हारचा सांस्कृतिक वारसा, आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्य यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होऊ लागले आहेत. पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गरम्य, हिरवेगार आणि खळखळून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी येतात. जव्हार हिल स्टेशन तुम्हाला व्यस्त जीवनाच्या वेळापत्रकातून शांत आणि ताजेतवाने करते.

जव्हारला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या आदिवासी भूमीतील रंगीबेरंगी नृत्ये, वैविध्यपूर्ण संस्कृती, निसर्गाच्या अगदी जवळ असलेली अव्वल दर्जाची रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स, टेकड्या, जंगलात जाणाऱ्या पायवाटा, संपूर्ण परिसराचे मनमोहक पावसाळी निसर्गचित्र आणि प्रस्तावित प्रकल्पाचे आकर्षण जसे की चित्र- वारली कॉन्क्लेव्ह, खड-खड धरण, नारलीधारा खोऱ्यातील रोपवे, कोणत्याही पर्यटकाला नक्कीच भुरळ घालतील. शहरवासियांसाठी आरामात आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे.

जव्हारमध्ये अनेक स्थानिक आकर्षण आहेत जी पाहण्यासारखी आणि एक्सप्लोर करण्यासारखी आहेत. 


खड्खड धरण : खड्-खड धरणामुळे जव्हारमधील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. खड्-खड धरणाच्या आजूबाजूचे निसर्गरम्य स्थान साहसी पर्यटनासाठी इच्छुक असलेल्या पर्यटकांसाठी एक उत्तम आकर्षण आहे.


जयविलास पॅलेस : राज बारी या नावाने ओळखला जाणारा भव्य जय विलास राजवाडा हा मुकणे घराण्याच्या राजाचा निवासी वाडा होता. हा राजवाडा राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधला होता. यासाठी वापरण्यात आलेला सायनाईट दगड हा ५ किमी अंतरावरील कालिधोंड येथून आणण्यात आला होता . गुलाबी दगडाचा वापर करून बांधण्यात आलेला हा राजवाडा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

जय विलास राजवाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला होता, दाट जंगल आणि चोहोबाजूंनी काजूच्या बागांनी वेढलेला होता. मुख्य दरवाजापासून राजवाड्याकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूंनी दाट झाडींनी वाढलेला आहे. राजवाड्याचे घुमट अतिशय आकर्षक आहेत आणि हिरवाईने नटलेला हा राजवाडा पूर्वीच्या मुकणे घराण्यातील आदिवासी राजांची संस्कृती आणि जीवनशैली दर्शवतो.

पॅलेसमध्ये मुकणे जमातीची सुंदर चित्रे आहेत. यात मुलांची पाळणाघर, ड्रॉइंग रूम, पुरातन फर्निचर, बेडरुममध्ये भरलेले प्राणी आणि मोठी लॉबी आहे. राजवाड्यात एकूण जवळपास 50 खोल्या आहेत. जव्हारमधील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ चित्रपटाच्या शूटिंगसाठीही प्रसिद्ध आहे.

भूतकाळातील समृद्ध आणि भव्य जीवन पहावयाचे असल्यास जयविलास पॅलेसला एक भेट बनतेच..


जयसागर बंधारा : राजघराण्याने १९५६ मध्ये बांधलेले, हे धरण त्यांच्या प्रजेच्या कल्याणासाठी राजघराण्याच्या समर्पणाचा मूक साक्षीदार आहे. राजघराण्याच्या शाही सुविधा सरकारने बंद केल्यानंतरसुद्धा या धरणाच्या बांधणीचा संपूर्ण खर्च राजघराण्याने उचलला होता. घनदाट जंगलांनी वेढलेले, हे स्थान एखाद्याला मूलभूत पातळीवर निसर्गाशी संवाद साधण्यास प्रवृत्त करते.


जुना राजवाडा : मध्यवर्ती ठिकाणी एक चौक आणि सुंदर मढवलेले लाकडी खांब आणि इतर वास्तुशिल्प चमत्कार, भूतकाळातील वैभवाचा साक्षीदार असलेला असलेला हा एक पारंपारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा राजवाडा आहे. आवारात प्राचीन गणेश मंदिर आहे.


सनसेट पॉइंट : जव्हारमधील प्रसिध्द असे सनसेट पॉइंट हे नयनरम्य ठिकाण आहे. दूरवर दिसणाऱ्या सूर्यास्ताचे दृश्य एक अद्भुत नेत्रसुखद दृश्य आहे. सनसेट पॉइंटजवळच जव्हारच्या ग्रामादेवेतेचे मंदिर आहे.


हनुमान पॉइंट : शहराच्या पूर्वेला निवडूंगाच्या गर्द जंगलाने वेढलेले भगवान हनुमानाचे जुने मंदिर असून त्याला कात्या मारुती मंदिर असे स्थानिक संबोधतात. मंदिर तीन बाजूंनी सुमारे 500 फूट खोल दरीने वेढलेले आहे. हा हनुमान पॉइंट म्हणून ओळखला जातो. येथून उजवीकडे भव्य जय विलास पॅलेससह जव्हारचे 360 अंशाचे दृश्य पाहता येते. कड्यावरून जव्हारकडे जाण्यासाठी वळणदार रस्ता आहे. याच कड्यावरून क्रांतीवीर सावरकरांनी ध्यान केले होते. दिवसा येथून शहापूर माहोलीचा ऐतिहासिक किल्ला दिसतो. पहाटे दाट धुक्याने झाकलेले आजूबाजूचे डोंगर पहायला मिळतात. येथील दरी देवकोबाचा कडा म्हणून ओळखली जाते. येथून आपण सुंदर सूर्योदय पाहू शकतो आणि आसपासच्या दरी, उंच टेकड्या आणि शाही जय विलास पॅलेसचे सौंदर्य घेऊ शकतो. येथे खंडोबाचे मंदिर देखील आहे. दसरा हा सण येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला सनराईज पॉइंट म्हणून ओळखले जाते. येथील पर्वत रांगा आणि खोल दर्‍यांचे विलोभनीय दृश्य तुम्हाला भुरळ घालेल.


चला तर, या आणि आपल्या संवेदनांसाठी मेजवानीचा आनंद घ्या…

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 26.1°С

Feels Like 26.1°С. clear sky

गॅलरी

कसे पोहोचाल?