Pleasant Palghar
image

नांदगाव : स्वातंत्र्य आंदोलनातील अग्रेसर गाव

पालघर तालुक्यात नांदगाव नावाची दोन गावे आहेत. एकेकाळी तारापूर व मनोर हे दोन परगणे होते या परगण्यातील ही ती गावं. नांदगाव हे पालघर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील स्वातंत्र्य आंदोलनात अग्रेसर राहिलेल असं गाव आहे. १९४२ च्या क्रांतीपर्वात पालघर येथे झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामात ज्या वीरांनी मायभूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यात नांदगावचा सुपुत्र गणेश ठाकूर हा अवघ्या सतरा वर्षांचा तरुण सहभागी झाला होता. या आंदोलनात तो १७ वर्षीय तरुण हुतात्मा झाला आणि आपल्या गावाचं नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अजरामर करून गेला..  आज नांदगावात प्रवेश करतानाच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल हुतात्मा स्मारक आपलं लक्ष वेधून घेतं आणि क्रांतिकारकांच्या स्मृती जागवत..

नांदगाव या गावच आणखी एक आकर्षण म्हणजे समुद्रकिनारी असलेल्या सात पत्थरांची रांग. निसर्गाचा हा एक अद्भुत चमत्कारच आहे. हवा आणि वाऱ्याच्या घर्षणामुळे खडकांची सतत झीज होऊन त्यांना विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे आणि भाविकांनी  सुद्धा आपली श्रद्धा अर्पण करून त्यांना “देवत्व” बहाल केलं आहे. सप्त कुमारिका या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे…

शिव मंदिर, नांदबा देवी मंदिर तसेच गावात अजून काही देवस्थान आहेत.. जाणकार लोकांच्या मते नांदबा देवीच्या नावावरून गावाचे नाव नांदगाव असे पडले असावे.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

ऑक्टोबर ते मे

image

Current Temperature

 25.9°С

Feels Like 26.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?