Pleasant Palghar
image

सातपाटी

विस्तीर्ण समुद्र किनारपट्टी लाभलेले  पालघर जिल्ह्यातील  एक प्रमुख  गाव ...  सातपाटी गावची तशी ओळख ही प्रामुख्याने एक नैसर्गिक  बंदर आणि   मासेमारी व्यवसाय करणाऱ्या  लोकांचे  गाव  जरी असेल तरी अनेक राजकीय तसेच सामाजिक आंदोलनाचे उगमस्थान  म्हणून सातपाटी गावाची दुसरी ओळख  आहे ...... 

सातपाटी गाव  अजून ओळखले जाते ते गावात असलेल्या सुमारे १४० वर्ष जूने "राम मंदिर "आणि त्या मध्ये असलेली अजानबाहू हनुमंतांची "वैशिष्टपूर्ण मूर्ती " संपूर्ण  महाराष्ट्रात या  धाटणीची मूर्ती  पाहायला मिळणार  नाही हे  एक विशेष .... 

दरवर्षी  रामनवमीला या मंदिरा समोर रामनवमीला नित्यनेमाने भरणारी  ३ दिवसिय  जत्रा  कट्टर  सातपाटीकर या ३ दिवसात जगाच्या  पाठीवर कुठेही असला तरी तो मनाने या ३ दिवसात या जत्रेत असतो.. 

सातपाटी हे खऱ्या अर्थाने जगभरात ओळखले जाते ते जगप्रसिद्ध  अश्या  “सरंगा” ( पापलेट ) या माश्याचा  मच्छिमारीसाठी.  या माश्यासाठी आमचे  कोळीबांधव  खोल समुद्रात जिवावर उदार होऊन  गुजराथ मधील सौराष्ट्र   ते पार कछ च्या खाडी पर्यंत  खोल समुद्रात  मासेमारी  साठी जातात ... या  माश्यामुळे  दरवर्षी  सातपाटी  गाव देशाच्या तसेच जगाच्या नकाशावर ठळक पणे  झळकत  आहे  अगदी जपान सारख्या  देशाने तर त्याने त्याला खास  प्रसिद्धी दिली  आहे. हा मासा जगभरात अनेक  देशा  मध्ये निर्यात  होत असल्यामुळे   दरवर्षी  कोट्यवधींचे  परकीय चलनाची  भर आपल्या देशाच्या  तिजोरीत पडत आहे त्यामुळे  देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये  सातपाटी गावाचे  सुद्धा महत्वाचं योगदान  आहे याचा आम्हा  सगळ्यास निश्चितपणे अभिमान आहे.. 

सामाजिक आणि सहकार क्षेत्रा बाबत  बोलायचे  झाल्यास सातपाटी हे एक अग्रगण्य नाव आहे  भारतात स्वातंत्र्याची पहाट  उगविण्या आधीच सातपाटी  गावात सातपाटी मच्छिमार  विविध कार्यकारी  सहकारी  संस्था मर्यादित  (१९४४) आणि सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय  सहकारी संस्था  मर्यादित  (१९४७) स्थापन झाल्या होत्या .. तसेच  गावात वैती, मांगेला,माळी , भंडारी , मुस्लिम  समाजाचे  लोक वर्षानुवर्षे गुण्या गोविंदाने  एकत्र  नांदत आहेत..  सातपाटी  हे गाव खऱ्या  अर्थाने "राष्ट्रीय एकात्मतेचे "मूर्तिमंत  उदाहरण आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सातपाटी गावाचे अतुलनीय असे योगदान राहिले आहे  १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर तालुक्यात  राम मंदिर  येथे  निघालेल्या  ऐतिहासिक मोर्च्यात  गावातील काशिनाथ  हरी पागधरे या तरुणाने  हौतात्म्य पत्कारून गावचं  तसेंच  जिल्ह्याचं नाव उज्वल केलं.  त्याच्या पराक्रमाची साक्ष  देणारं हुतात्म स्मारक गावच्या समुद्र किनाऱ्यावर सुरुच्या झाडांच्या  सावलीत उभे आहे. तसेच  या हुतात्म्यांच्या बलिदानाचा  बदला घेण्यासाठी तसेच  काकोरी कटाची  आठवण  करून देणारा २७ ऑक्टोम्बर १९४२ रोजी लष्कराची गाडी उडवून देण्याचा  धाडसी कट  या  गावातील  क्रांतिकारकांनी रचला होता...... 

आज सातपाटी गाव हे तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबतीत  सर्वात मोठे गाव आहे तसेच सगळ्यात  मोठी ग्रामपंचायत सुद्धा याच गावात आहे


विशेष उल्लेखनीय:

१. तालुक्यातील मुलींसाठी ची  "एकमेव कन्याशाळा "ही  सातपाटी  गावात  आहे 

२. सातपाटी  गावचे सुपुत्र श्री  जनार्दन  शंकर पाटील यांना सामाजिक  कार्य   साहित्यसेवे  बद्दल ६ राष्ट्रीय ,८० राज्यस्तरीय आणि ३ आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत हा एक जागतिक रेकॉर्ड म्हणावा  लागेल 

३. इतनी शक्ती हमें देना दांता ... या प्रसिद्ध हिंदी गीताच्या  गायिका "पुष्पा पागधरे" यांचं मूळ गाव सुद्धा  सातपाटी

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

image

Current Temperature

 29.1°С

Feels Like 34.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?