Pleasant Palghar
image

शिरगाव : श्रीग्राम

शिरगाव पालघर जिल्ह्याच्या  समुद्रकिनारी असलेल्या प्रमुख गावांपैकी एक आहे. इतिहासाचार्य  वि का राजवाडे यांनी शिरगाव या गावाची  व्युत्पत्ती  श्री ग्राम अशी सांगितली आहे. रमणीय समुद्रकिनारा लाभलेले हे गाव नावाप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर आहे. शिरगाव या गावात एकेकाळी  पिकणारी  मिरची शिरगावची मिरची म्हणून प्रसिद्ध  होती. मुंबईच्या मार्केटमध्ये ह्या मिरची ला मोठ्या प्रमाणात मागणी असे…

गावाच्या दक्षिणेला किल्ल्याच्या मागे खामगाव देवीचे सुंदर विलोभनीय मंदिर आहे. गर्द झाडीत असलेले हे मंदिर मनाला विलक्षण शांततेचा अनुभव देते..  शिरगाव सातपाटी रस्त्यालगत  कमलीशाह बाबा यांचा प्रसिद्ध दर्गा आहे हा दर्गा म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे…

शिरगाव हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे आणि पोर्तुगीज यांच्या काळात एक महत्त्वाचा लष्करी ठाणं होतं.  शिरगावचा  प्रसिद्ध किल्ला हा मराठ्यांच्या  जय  व  पराजय यांचा मूक साक्षीदार आहे. पर्यटनदृष्ट्या सुद्धा शिरगाव एक महत्त्वाचे स्थळ आहे. रणझुंजार मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार शिरगावचा किल्ला गड प्रेमींचे हक्काचे आवडते ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यालगत महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांची मान्यता असलेली अनेक  लहान-मोठी हॉटेल्स सुट्टीचा दिवस व  विकेंड च्या दिवशी पर्यटकांच्या गर्दीने भरून गेलेली असतात.

काय पहाल :

शिरगावचा प्रसिद्ध किल्ला

शिरगाव समुद्रकिनारा

कमली शहा बाबांचा दर्गा

खामजाई मंदिर

शंकराचे मंदिर

सप्तशृंगी माता मंदिर

एप्रिल व मे महिन्यात होणारा बोहाडा उत्सव

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 18.6°С

Feels Like 17.5°С. overcast clouds

कसे पोहोचाल?

पुढे कुठे?