महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार नावाचे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. ह्या जव्हार पासून साधारण ५ किमी वर एका छोट्याशा टेकाडावरती एक गवताळ माळरान आहे ज्याला म्हणले जाते शिरपाचा माळ. आता हे साधेसे माळरान नशीबवान असण्याचे एक खास कारण म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या ठिकाणी एक रात्र मुक्काम केला होता.पालघर जिल्ह्यात असे हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्वतः येऊन गेले आहेत . खरोखर शिरपाचा माळ हे ठिकाण नशिबवानच म्हणावे लागेल कि ज्या ठिकाणाला या श्रीमंतयोगी राजाचा पदस्पर्श लाभला आहे.
इसवी सन १६६४ साली महाराजांनी मुघल साम्राज्यातील एका ऐश्वर्यसंपन्न नगरीवर सुरतवर स्वारी घालण्याचा साहसी बेत आखला. औरंगजेबाने स्वप्नातही विचार केला नसेल असा अशक्यप्राय पराक्रम महाराजांनी करून दाखवला. तेव्हा राजगड ते सुरत ह्या प्रवासात जिथं जिथं महाराजांनी मुक्काम केला त्या पैकी एक ठिकाण म्हणजे शिरपाचा माळ. त्याकाळी जव्हार संस्थानचे राजे विक्रमशाह यांनी महाराजांचे स्वागत केले आणि शिरपेच देऊन यथायोग्य सन्मान केला.
त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी जव्हार ह्या थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्याल तेव्हा वेळात वेळ काढून शिरपाचा माळ ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. अशी जागा जी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्या पुण्यवंत दिग्विजयी राजाचा सहवास अनुभवण्याचे भाग्य ह्या माळरानाला लाभले. शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे सलगी देणे । कैसे असे ।। हे ह्या माळरानाने प्रत्यक्ष पाहिले आहे.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
संपूर्ण वर्षभर
Current Temperature
17.8°С
Feels Like 16.4°С. overcast clouds360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा
कसे पोहोचाल?
जवळचे बस स्थानक : जव्हार शहरापासून शिरपामाळ जवळच असल्याने आगारातून मोखाडा, नाशिक येथे जाणार्या सर्वच बसेस येथे थांबतात.