Pleasant Palghar
image

भाविकांचे श्रद्धास्थान डहाणूची श्रीमहालक्ष्मी

पालघर जिल्ह्य़ातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या विवळवेढे गावी महालक्ष्मीचे स्थान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहे. त्याच्या दोन्ही बाजूंला दोन होमकुंडे आहेत. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठा होम (यज्ञ) व वद्य अष्टमीला लहान होम असतो. या दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला मोठय़ा होमाच्या दिवशी हजारो भाविक पायी देवळात येऊन देवीचे दर्शन घेतात. मंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्रपौर्णिमेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा. या यात्रेची तयारी ज्येष्ठ प्रतिपदेपासून होते. नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्र, सिल्वासा, दमण, वापी आणि गुजरातच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोकण, पूणे, सातारा तसेच महाराष्ट्रातून तसेच  गुजरात, दादरा नगरहवेली येथील भाविक दर्शनासाठी येतात. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी  दरसाल महालक्ष्मी यात्रेसाठी एक ते दीड लाख भाविक येतात.


देवीचे मुख्यस्थान मंदिराच्या पश्चिमेस पर्वत शिखरांवर जमिनीपासून सुमारे ६०० फूट उंच असून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला शिखरावर चढून ध्वज लावण्याची प्रथा रूढ आहे. हा मान पांडय़ा सातवी यांच्या घराण्यातील व्यक्ती एक महिना सात्त्विक राहून कुटुंबांपासून दूर राहून भक्ती करतो. त्यालाच हा मान दिला जातो. अणकु चीदार दिसणाऱ्या महालक्ष्मी गडाच्या शिखरावर सुमारे २५ फूट व्यासाची वर्तुळाकार सपाट भाग आहे. या शीखराच्या  मध्यभागी लाकडी स्तंभावर प्रत्येक यात्रोत्सवाला ध्वज लावण्याची परंपरा आहे. मंदिरापासून शिखरापर्यंतचा सुमारे ३ ते ३.३०  तासांचा हा प्रवास आहे.  गडाच्या सूळक्यावर धावत जाऊन ध्वज लावणारा ध्वजनी चैत्र पौर्णिमेला रात्री १२ वाजता देवीच्या मंदिरापासून हातामध्ये तेवता दिवा, पूजेचे साहित्य, ध्वज, १२ नारळ घेऊन निघतो, तो मध्यरात्री ६०० फुट उंचीवर असलेल्या देवीच्या मुख्य स्थानी पोचतो. देवीच्या  या स्थानांजवळ देवीची गुहा असून त्यात वाघाचा वास आहे,  असे म्हणतात. गुहेशेजारी २० फूट लांबीचे भुयार असून अत्यंत अवघड आहे. ध्वजनीला प्रथमदर्शनी वाघाचे दर्शन दिल्यानंतर तो अदृश्य होतो. देवीचे मुळस्थान शिखरांवर असतांना भाविकांना दर्शन घेण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी येऊन स्थापित झाली, अशी आख्यायिका आहे. सातवी घराण्यातील पूर्वधार देवीची सेवा करणारे सात पुजारी पूजा करतात.


मंदिरातील पुजारी आदिवासी असून त्या लोकांत ही देवी ‘कोळवणची महालक्ष्मी’ म्हणून प्रसिद्ध आहे. कोळवण या शब्दाचा अर्थ कोळी लोकांची देवी. मात्र तसा कुठेच लिखित उल्लेख नाही. देवीचे वर्षभरात चैत्र पौर्णिमा उत्सव, नवरात्रोत्सव आणि माघ महिन्यातील शुद्ध द्वादशीला 'वाघबारसी'चा उत्सव असे तीन उत्सव होत असतात. देवीच्या दर्शनासाठी भंडारी, वाडवळ, कोळी, इराणी, बागायतदार, आदिवासी यांची नेहमी गर्दी असते. तिन्ही उत्सवांत अष्टमीला होम होतात. बारशी हा महालक्ष्मी येथील महत्त्वाचा उत्सव आहे. बहुतेक त्या दरम्यान परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांची शेतीची कामे आटोपलेली असतात. तारपा हे वाद्य घेऊन या उत्सवासाठी डहाणू, तलासरी, बोईसर, जव्हार भागातूनच आदिवासी बांधव एकत्र येतात. त्या दिवशी सर्व आदिवासी बंधव तारपा नृत्य नाचतात. या दरम्यान शेतात नवे पिक आलेले असते. हा सण भाद्रपद महिन्यात असतो.


या परिसरात शेत, माळरान व परसात जे पिकते ते या देवीला वाहिल्याशिवाय भक्षण केले जात नाही. निसर्ग पुजक आदिवासी समाज यानिमित्ताने येथे जमतो.


आख्यायिका

महालक्ष्मी देवी मंदिराबाबत मंदिराचे पुजारी सांगतात की, प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी माता कोल्हापुरातून सहलीला निघाल्या होत्या. त्यावेळी पांडव वनवासातून जात होते. महालक्ष्मी माता जेव्हा डहाणूला पोहोचल्या तेव्हा खूप रात्र झाली होती, त्यावेळी त्यांना भीमा भेटला. भीमाने दागिन्यांनी सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो त्यांच्यावर मोहित झाला. त्याने महालक्ष्मी मातेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. महालक्ष्मी मातेने त्याचा हेतू स्पष्ट न दिसल्याने एक अट घातली. देवी म्हणाली की एका रात्रीत तू सूर्या नदीला बांध घालून नदी अडवली तरच आपल लग्न होईल. भीमा नदीवर धरण बांधू लागला. महालक्ष्मी मातेला काही अनर्थ घडेल असे वाटल्यामुळे तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि आरवण्याचा आवाज काढला. भीमाने सकाळ झाली असे समजून आपला पराभव स्वीकारला आणि निघून गेला.


आई रानशेतजवळच्या भुसळ डोंगराच्या गुहेत जाऊन बसली. वेळ निघून गेली. मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले. एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी गेली. डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आली. ती बेशुद्ध पडली. महालक्ष्मी मातेला त्याचे वाईट वाटले. महालक्ष्मी माता म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस, आता मी खाली येते. महालक्ष्मी माता डोंगरावरून खाली येऊन विवळवेढे गावात स्थायिक झाली. चैत्र नवरात्रीत येथे मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरावर अर्पण केला जातो. वाघाडी गावचे पुजारी नारायण साटवी तो ध्वज अर्पण करतात.


सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर. चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून १५ दिवस मंदिर परिसरात भव्य यात्रोत्सव असतो.

image

Current Temperature

 28.2°С

Feels Like 32.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?