पालघर जिल्हा म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला चमत्कार!!!पश्चिमेला अथांग अरबी समुद्र तर दक्षिणेला महानगरी ठाणे मुंबई उत्तरेस दादरानगर हवेली, दीव दमण तर पुर्वेस बेलाग आणि राकट सह्याद्री.....
सूर्यमाळ हे ठिकाण पालघर जिल्ह्याच्या पुर्वेस मोखाडा तालुक्यात येते . पावसाळ्यात येथील सौंदर्य विशेष बहरून निघते .. पावसाळ्यातील इथलं वातावरण आणि सृष्टी सौन्दर्य बघून डोळ्यांचे पारणे फिटते . उन्हाळ्यात येथील थंड हवा व करवंदे, तोरणे, जांभूळ, धामणे, आंबा, आळवा यासारखा रानमेवा आत्मा तृप्त करून टाकतो. येथील जंगलात अनेक रान औषधी वनस्पती गुणकारी आहेत. त्यात हाडमोडीवरील औषध खूपच प्रभावी व प्रसिद्ध आहे. तसेच इथला सनसेट पॉईंट सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
इथले अदिवासी बांधव एक जंगली वनस्पतीच्या मुळ्या गोळा करतात. हाड मोडल्यावर त्या मुळ्या पाण्यात भिजवून घेतल्यास ७ ते ८ दिवसात हाड जुळून येते.हाडमोडीचे औषध म्हणून ते प्रसिद्ध आहे. सुर्यमाळच्या पुर्वेस हौशी ट्रेकर्सना खुनावणारे पर्वत व गडकिल्ले आहेत त्यात हरिहर किल्ला, ब्रह्मगिरी पर्वत, अंजनेरी पर्वत, वतवड्या डोंगर,थळघाट तर पश्चिमेला कोहोज किल्ला. अशा निसर्गरम्य सुर्यमाळला एकदा नक्की भेट द्यायलाच हवी..
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
16.1°С
Feels Like 14.6°С. overcast clouds360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा
कसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : कसारा , इगतपुरी रेल्ववे स्थानक
जवळचे बस / रिक्षा स्थानक: पालघर , वाडा येथून नियमित अंतराने एसटी बस उपलब्ध