जव्हार-सिल्वासा मार्गावरून जाताना ४ ते ५ किमीवर जामसर गाव आहे. येथे प्रसिध्द स्वयंभू शिवमंदिर आहे. काही वर्षांपूर्वी ह्या मंदिराचे जीर्णोद्धार करीत असताना खोदकामात मंदिराजवळील तळ्यात अनेक दुर्मिळ शिल्प सापडले. गावातील तलावात सापडलेल्या या मूर्तीं 12 व्या शतकातील आणि मध्ययुगीन काळातील असल्याचे तज्ञ सांगतात. या ठिकाणी अनेक दुर्मिळ शिल्पं सापडली आहेत. या शिल्पांमध्ये वीरगळे आहेत. वीरगळे म्हणजे लढाईत मरण पावलेल्या वीराचे प्राचीन स्मारकं. 5 तोंडाची गाय, खाली एक वासरु आणि एकच शरीर असं दुर्मिळ शिल्पही या खोदकामात सापडलं आहे. संशोधनानंतर मुंबई विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील दोन अभ्यासकांना जामसर पाणथळ जागेजवळ पुरातत्त्व सर्वेक्षणात ११४ कलाकृती सापडल्या आहेत. या कलाकृती सहावे ते तेराव्या शतकादरम्यानच्या असाव्यात असा होरा अभ्यासकांनी मांडला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार जामसर तलावाजवळ पुराणकालीन रस्ताही आढळला आहे. पुराणकाळात व्यापारादरम्यान या मार्गाचा वापर केला जात असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.
मंदिर परिसरात आदिवासी जमातींचे वाघोबा देवस्थान आहे. हे देवस्थान जागृत देवस्थान समजले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात मोठा उत्सव असतो. स्थानिक वस्तू, प्रसादाच्या साहित्याच्या दुकानांनी मंदिर परिसर गजबजून जातो. मंदिराच्या रंगरंगोटीसोबतच वाघोबा देवाला शेंदूर चढवला जातो. शेंदूर चढवल्यानंतर वाघोबा देव वाघाच्या रुपात येऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतो अशी स्थानिक आदिवासींची धारणा आहे. या गावात एकूण 3 तळी आहेत. अनेक दशकांपासून या तळ्यातील पाणी आटलेलं नाही, असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
जामसर गावाची दुसरी ओळख म्हणजे गावातील प्राचीन तलावाला पाणथळ जागा म्हणून घोषित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. पाणथळ जागा आणि जैवविविधता संरक्षण-संवर्धन तसेच शाश्वत विकासासाठी अशा प्रकारे तलाव पाणथळ जागा म्हणून घोषित करणारी राज्यातील ही पहिलीच ग्राम पंचायत. जामसर तलावाच्या स्वतंत्र क्षेत्रात ५९ वनस्पतींचे अस्तित्व आढळले आहे. त्यापैकी १० दुर्मीळ प्रजाती आहेत. दोन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर एक अत्यंत दुर्मीळ मानली जाते.
ह्या गावाला भेट देणे म्हणजे इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तर एक पर्वणीच आहे..
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.
संपूर्ण वर्षभर
Current Temperature
14.7°С
Feels Like 13.1°С. overcast clouds360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा
कसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्टेशन: इगतपुरी, डहाणू
जवळचं बस / रिक्षा स्थानक : जव्हार बस स्थानकापासून या ठिकाणी येण्या साठी बस उपलब्ध
निवासाची व्यवस्था: जव्हार येथे हॉटेल्स उपलब्ध आहेत.