Pleasant Palghar
image

तुंगारेश्वर

वसईला पूर्वेला सातिवली येथील तुंगारेश्वर पर्वतावर शंकाराचे फार प्राचीन  मंदिर आहे . याठिकाणी  महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनाला येतात .तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि  तुंगारेश्वर अभयारण्याच्या परीक्षेत्रात येत असल्याने वन्य प्राण्याचा  वावर हि मंदिराच्या आसपास  आढळतो .विमालासुर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येउन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासुर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे.


तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २१७७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातलं  खास आकर्षण बनल आहे.भगवान  परशुरामांचे येथे वास्तव्य होते. तुंगारेश्वर भागात धबधबे असल्याने निसर्गासोबत मनमुराद आनंद लुटण्यासाठी मुंबईसह आजुबाजुच्या परिसरातून पर्यटकही येतात. तुंगारेश्वर पर्वत हे पर्यटन स्थळ शासनाने घोषित केले आहे. हर हर महादेव , बम बम भोलेचा नारा देत वृद्धांसह तरुण, महिला वर्ग शंकराचे दर्शन घेण्यासाठी पर्वत चढततात तर तुंगारेश्वर देवस्थान संस्थेने याठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची तसेच सातिवली येथील स्थानिक कामगार युनियनतर्फे डोंगरावर पायी चालत येणार्या भाविकांसाठी फल आणि उपहाराची व्यवस्था केली जाते . त्यामुळे दर्शन घेण्यासाठी वसई तालुक्यासह, पालघर, डहाणू, ठाणे तसेच अन्य भागातूनही भाविक येतात.


सातिवली येथे उतरून भाविक दर्शनासाठी डोंगर चढून शंकराच्या मंदिरात जातात. मात्र येथील रस्ता नादुरुस्त आहे. त्यामुळे वाहनांसह पायी जाणाऱ्या  भक्तांचे हाल होतात. . रस्त्यांवर विजेची व्यवस्था नाही तसेच रस्ताही नादुरुस्त आहे. यामुळे वाहतुक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. याचा पर्यटकांना नाहक त्रास होते आहे. परंतु मुंबई पासून थोडसं लांब असलेले हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धब्धब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.


एक दिवस पूर्ण मजेत जाइल याची शाश्वती बाळगा.


हर हर महादेव !!

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून

image

Current Temperature

 16.8°С

Feels Like 15.4°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?