पालघर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक असलेले मातेरा पिक हे डेंगाचीमेट गावातील मातेरा टेकडीवरील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी काही वर्षांपूर्वीच शासनातर्फे हे स्थळ विकसित करण्यात आले आहे. ह्या स्थळाचे विशिष्ट म्हणजे पालघर जिल्ह्यातील बहुतेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे, बंधारे, गड, किल्ले मातेरा टेकडीवरून दुर्बिणीच्या सहाय्याने न्याहाळू शकतो. माथ्यावरून चारही बाजूने दरीचे सुंदर दृश्य पाहता येते.
मातेरा टेकडी जव्हार-डहाणू रस्त्याच्या मधोमध डेंगाचीमेट गावाजवळ आहे. गावातून सरळ वाटेने गेल्यानंतर अगदी ५०-१०० मित्राचे छोटे ट्रेकिंग केल्यावर आपण माथ्यावर पोहोचतो. टेकडीच्या वरपर्यंत येण्यासाठी शासनातर्फे चांगल्या रस्त्याची सोय आहे. अगदी वर पार्किंगची देखील सोय केलेली आहे. त्यामुळे येथे येणे खूपच सुलभ आहे. टेकडीच्या माथ्यावरून डहाणू तालुक्यातील धामणी धरण, महालक्ष्मी गड, गंभीर गड, अशेरिगड, कोहोज किल्ला ही स्थळे न्याहाळू शकतो.
पर्यटन स्थळ म्हणून नव्यानेच विकसित केल्यामुळे येथे अजून पर्यटकांची गर्दी नसली तरी हळूहळू येथे पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. मातेरा टेकडीसोबतच डेंगाचीमेट आपल्याला समृद्ध आदिवासी संस्कृतीचेही दर्शन घडवते.
चला तर मग कधी येताएत डेंगाचीमेट पाहायला!!
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
16°С
Feels Like 14.5°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
डहाणू, जव्हार बस स्थानकापासून डेंगाचीमेटपर्यंत एसटी बसेस व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
निवासाची व्यवस्था: जव्हार येथे हॉटेल्स उपलब्ध आहेत.