
वारली समाजासह एक दिवस
वारली समाज कसा राहतो, त्यांची जीवनशैली कशी आहे ह्याचे आपल्यापैकी अनेकांना कुतूहल असते. ही गोष्ट जाणून काही खासगी पर्यटन प्रदात्यांकडून वारली समाजासह एक दिवस ही संकल्पना आणली आहे. ह्या संकल्पनेअंतर्गत पर्यटकांना पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुल्यातील गावात राहणाऱ्या वारली समाजाच्या कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळते. त्याचसोबत वारली समाजाची दैनंदिन कामे, पारंपारिक वारली जेवण त्याचबरोबरीने वारली कला, तारपा नृत्य ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली जाते.
संपर्क:
जव्हार टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड
ईमेल: jawhartourism@gmail.com
फोन: +९१ ९२२६८ ७२१८७