Pleasant Palghar
image

डहाणू

डोंगरी व सागरी भागात वसलेला डहाणू हा पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. डहाणू तालुक्याची रचना ही पुर्वेस डोंगराळ व  पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी अशी आहे. तालुक्यातुन मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 जातो. सदर राष्ट्रीय महामार्गावर तवा, घोळ, चारोटी, महालक्ष्मी, विवळवेढे, धानीवरी, दापचरी ही डहाणू तालुक्यातील गावे आहेत. डहाणू तालुक्यातून लोहमार्ग जात असून सदरील लोहमार्गावर वाणगाव, डहाणू, घोलवड व बोर्डी ही स्थानके आहेत. डहाणू तालुक्यात वारली, कातकरी, धोडी, दुबळा, कोंकणा, मल्हार कोळी या आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.

जगप्रसिध्द चिकू डहाणू तालुक्यातील घोलवड या गावी पिकवले केले जातात. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिकू व नारळ तसेच इतर फळबागामध्ये लिची, आंबे, फणस, केळी इत्यादी यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. समुद्रकिनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते, त्यामध्ये मिरची, वॅनीला, टोमॅटो यांचे लागवड क्षेत्र जास्त असून दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो.

पर्यटनाच्या बाबतीत समृध्द असलेल्या डहाणू तालुक्यात महालक्ष्मीचे जागृत देवस्थान, आशागढ येथील श्री संतोषी माता मंदिर व नरपड येथील श्री साईबाबा मंदिर, कोसबाड येथे श्री मल्लिनाथ जैन मंदिर ह्या प्रसिध्द धार्मिक स्थळांसोबतच डहाणू , नरपड, बोर्डी, चिंचणी येथील सुंदर समुद्रकिनारे, डहाणू फोर्ट  ई. महत्वाची पर्यटनस्थळे आहेत.

जगप्रसिध्द वारली पेंटींगचा उमग डहाणू तालूक्यात झालेला असून श्री जीव्या म्हसे यांनी वारली पेंटींग या क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.