Pleasant Palghar
image

वसईची ऐतिहासिक सहल

वसई, मुंबईच्या अगदी जवळ असलेले तरीही स्वतःची ओळख जपलेले शहर. ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक मंदिरे, ऐतिहासिक चर्चेस ह्या सर्वांना सामावून घेणारे ऐतिहासिक शहर. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाच्या सहलीसह शांतता मिळवण्यासाठी हे अगदी योग्य स्थान आहे. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर तुमच्यासाठी खालील प्रवासाचा कार्यक्रम नक्कीच आवडेल.


सुरुवातीचे ठिकाण : वसई रेल्वे स्टेशन


स्थळ १ : वसईचा सुप्रसिद्ध किल्ला - रणझुंजार मराठ्यांच्या शौर्याचा आणि नरवीर चिमाजी आपांच्या पराक्रमाचा साक्षिदार असलेला, ऐन खाडीच्या मुखावर बांधलेला, ११० एकर पसरलेला आणि १० भक्कम बुरुज असणारा असा हा किल्ला. ह्या किल्याची सैर करण्यासाठी स्थानिक गाईडची मदत नक्कीच उपयोगात येईल.

वेळ : २ ते ३ तास


स्थळ २ : बौद्ध स्तूप: नालासोपारा - भगवान बुद्धाचे पद स्पर्श लाभलेले हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावे. प्राचीन इतिहासाची आवड असणाऱ्या इतिहास प्रेमींनी आवर्जून भेट द्यावं असं हे ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण आहे.

वेळ : १ तास


शेवटचे ठिकाण : नालासोपारा रेल्वे स्टेशन


गॅलरी