Pleasant Palghar
image

जव्हार

धबधब्याचा तालुका अशी ओळख असलेला जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण 70 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, महादेव कोळी, मल्हार कोळी ह्या आदिवासी जमातींची संख्या मोठया प्रमाणावर आहे.

जव्हार शहराला पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, हिरडपाडा धबधबा, देवगाव दसकोट धबधबा असे एक ना अनेक छोटे मोठे धबधबे जव्हार तालुक्याच्या नैसर्गिक सुंदरतेत भर घालतात. जव्हार तालुक्यास एैतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लाभलेले शिरपामाळ, भुपतगड, जय विलास पॅलेस, शेकडो वर्ष जुन्या विरगळ सापडलेले जामसर ही एैतिकासिक स्थळे आहेत. जव्हार तालुक्यामध्ये खंडेराव मंदिर जव्हार, हनुमान मंदिर जव्हार, राम मंदिर जव्हार, महादेव मंदिर जव्हार, अंबिका माता मंदिर जव्हार, शिवमंदिर बाळकापरा, राम मंदिर कडाचीमेट, विठठल मंदिर जव्हार, स्वामी समर्थ मंदिर जव्हार, शनी मंदिर जव्हार ही देवस्थाने आहेत. त्याचबरोबर  खंडोबा यात्रा जव्हार, विजयादशमी उत्सव जव्हार, शिवमंदिर यात्रा बाळकापरा व देवतळी यात्रा जामसर या ठिकाणी भरवली जातात. जव्हार शहर, डेंगाची मेट येथील मातेरा डोंगराचा माथा ह्या उंच ठिकाणावरील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतो. तालुक्यातील रामखिंड या गावी जगप्रसिध्द वारली पेटींग व देवदेवतांचे मुखवटे तयार केले जातात.