
पालघर
पालघर तालुका हा पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. पालघर जिल्हा ज्या प्रमाणे सागरी, नागरी, डोंगरी भागात विभागला गेला आहे त्याचप्रकारे पालघर तालुकाही सागरी, नागरी, डोंगरी भागात विभागला आहे. पालघर तालुक्यामध्ये प्रामुख्याने वारळी, कातकरी, मल्हार कोळी, इत्यादी आदिवासी जमाती आहेत. त्याचप्रमाणे कुणबी, वाडवळ, कोळी, आगरी, वंजारी, भंडारी, माळी व इतर समाजही मोठ्या प्रमाणात आहे.
तालुक्याला सोनेरी इतिहासाचा वारसा आहे. भारतीय स्वातंत्य लढयामध्ये ‘सन १९४२ चे चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र आहे