
तलासरी
तलासरी तालुका पालघर जिल्हयातील 8 तालुक्यांपैकी बहुतांशी (90.73%) आदिवासी बहुल तालुका आहे. तालुका केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात राज्य यांच्या सीमा भागेवर वसलेला आहे. तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रिय महामार्ग जातो.
वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या तलासरी तालुक्यात वारली ,धोडिया ,कोकणा ,कातकरी ह्या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळुन येतात. यामध्ये वारली समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. तलासरी तालुक्यात धोडिया, वारली, कोकणी भाषा बोलल्या जातात.
पर्यटन नकाशावर तलासरी तालुक्यातील झाई समुद्र किनारा, करंजगाव येथील कुंड, कुर्झे येथील धरण(दापचरी डॅम) प्रसिद्ध आहेत.