Pleasant Palghar
image

वसई

वसई तालुका हा पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त शहरीकरण झालेला तालुका आहे. वसई-विरार ही पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका वसई तालुक्यात आहे. समृध्द इतिहास असलेला हा तालुका अगदी पुराणकाळापासून व्यापाराचे एक महत्वाचे ठिकाण राहिले आहे. तालुक्यातील वसई, नालासोपारा ह्या ठिकाणी ग्रीक, अरब, पर्शिअन, रोमन व्यापारी येऊन गेल्याची नोंद आहे. भगवान श्री गौतम बुद्धांनीही नालासोपारा येथे भेट दिली होती.

वसई तालुक्याच्या पूर्वेतून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. पश्चिम रेल्वेची नायगाव, वसई, नालासोपारा, विरार ही स्थानके वसई तालुक्यात येतात. मच्छिमारीसाठी प्रसिध्द असलेल्या वसई तालुक्यात अर्नाळा, रानगाव, कळंब, भुईगाव, राजोडी, सुरुची येथील किनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. वसईचा प्रसिद्ध किल्ला एक महत्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. त्याशिवाय तुंगारेश्वरचे सुंदर अभयारण्य, तुंगारेश्वर येथील श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर, डोंगरी येथील श्री.दत्त मंदिर, गिरिज येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च ही काही प्रसिध्द पर्यटन ठिकाण आहेत.