Pleasant Palghar
image

विक्रमगड

26 जानेवारी 2002 रोजी निर्मिती झालेला विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन येथे बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे.  महालक्ष्मी डोंगराच्या अलिकडे व पूर्व पश्चिम पहुडलेला मातेरा डोंगर दिसतो.या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खो-यात वसलेले विक्रमगड हे तालुक्याचे ठिकाण आहे. 

पुर्वीच्या जव्हार संस्थांनातील कारभारामध्ये विक्रमगडला कुडाण असे नाव होते. जव्हारचे नरेश यशवंतराव महाराज यांच्या वाढदिवसाचे अवचित साधुन 10 डिसेंबर 1947 रोजी कुडाणचे विक्रमगड असे नामकरण केले. विक्रमगड तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणा मध्ये आदिवासी,कोकणा,कुणबी, वारली,ठाकुर, महादेव कोळी,मल्हार कोळी,ढोरकोळी व कातकरी इत्यादी जाती जमातीचे लोक रहातात.

विक्रमगडमधील आदिवासी तारपानृत्य विशेष प्रसिध्द असुन वारली चित्रकला विशेष लक्षवेधक आहे. विक्रमगडची सांस्कृतिक परंपरा म्हणजे तारपानृत्य व ढोलनाद होय. दसरा या सणाला सर्व आदिवासी आपआपल्या गांवात तारपानृत्य करीत असतात. विविध देवदेवतांचे मुखवटे घालून येथे बोहाडा उत्सव साजरा करण्यात येतो. 

नागझरी येथील पांडव कालीन श्री नागेश्वर महादेव मंदीर, पिंजाळ नदीवरील श्री.पंतगेश्वराचे महादेव मंदिर, मालवाडा पिक रोडवर असलेले हातोबा मंदिर, जांभे गांवाजवळ पलुचा धबधबा हे विक्रमगड तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ.

पर्यटन स्थळे