Pleasant Palghar
image

वाडा

वाडा कोलम ह्या तांदळाच्या वाणासाठी प्रसिध्द वाडा तालूका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेस असून मुख्यालयापासून 55 कि.मी अंतरावर आहे. हया तालूक्याचा बराचसा भाग भौगोलिक दृष्टया जंगलव्याप्त खडकाळ व दऱ्याखोऱ्यांचा आहे.

तालुक्यातील तिळसा येथे शंकराचे मंदिर प्रसिध्द आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. जवळच असलेले विठ्ठल रखुमाई मंदिरही प्रसिध्द आहे. त्याचबरोबर प्रसिध्द असा कोहोज किल्ला, गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेज, गुंजकटी येथील पुरातन शिव मंदिर, बुधवली येथील प्रसिध्द भाग्यरथी, वज्रेश्वरी, रेणुकामाता आणि महाकाली मंदिर, निंबवली येथील गरम पाण्याचे कुंड ही ठिकाणे येथील पर्यटनाला समृध्द करत आहेत.